Pages

खो-खो एक भारतीय खेळ

खो-खो हा एक भारतीय खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.
          ज्यात 12 खेळाडूं असतात, ते विपक्षी संघाच्या खेळाडूंचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात। संघाचे फक्त 9 खेळाडू मैदानात प्रवेश करतात। लोकां मधे अशी धारणा आहे कि खो-खो आणि कबड्डी सारखेच खेळ आहे, पण वास्तव्यात असा नाहीयेत।
             खो-खो मधे एक संघ, कोर्टच्या मध्यभागी, एका रांगेत, एक सोडून एक, एक दुसर्‍यांच्या विपरित दिशेला तोंड करून बसतात। दुसरा संघ आपल्या संघातील दोन किंवा तीन खेळाडूंना कोर्ट मधे पाठवतो। बसलेल्या संघाचा (डाव देणार्‍या संघाचा) ध्येय प्रतिस्पर्धींना “टॅग” करण्याचा असतो। पाठलाग करणारा फक्त एकाच दिशेला दवडु शकतो, व तो रांगेत बसलेल्या खेळाडूंच्या मधून निघु शकत नाही, त्यानी दुसर्‍या बाजुला जायला पूर्ण रांगेला गोल फिरून जायच असत।
          दुसरा विकल्प, तुम्ही दवडत असताना तुमच्या कडे पाठ असणार्‍या खेळाडूला पाठलाग करण्याच काम पास करणे, हा आहे। पाठलाग करणारा, ज्याला खो द्यायची असेल त्याचा (साधारणपणे लक्ष्याचा जवळचा) पाठीला हात लावून “खो” अस ओरडून खो दिल्याच सूचवतो। खेळाचा ध्येय शक्य तीतक्या कमीतल्या कमी वेळात सर्व प्रतिस्पर्धींना टॅग करण्याचा आहे। जर दुसरा संघ जास्त वेळ लावतो, तर पहिला संघ विजेता ठरतो।
     खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. ह्या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडुंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.


1.अर्जुन पुरस्कार

2.एकलव्य पुरस्कार (पुरुषांसाठी)

3.राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिंलांसाठी)

4.अभिमन्यू पुरस्कार (१८ वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी)

5.जानकी पुरस्कार (१६ वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी)