Wednesday, May 2, 2018

धन्यवाद "ती" चे...! पाच वर्षाच्या साथीचे...!


धन्यवाद "ती" चे...! पाच वर्षाच्या साथीचे...!

खरं तर जवळ जवळ पाच वर्षापुर्वी ती माझ्या आयुष्यात आली. योगायोगाने म्हणा नाहीतर नाशिबातच होती म्हणून म्हणा...
म्हणजे मला ती हवी-हवीशी वाटत होतीच् आधिपासून, पण धाडस होत न्हवतं तीला आपलं बनवायचं...
कारण सतत वाटत राहायचं की आपणाला तीची खरंच गरज आहे का? आपण तीच्यासोबत व्यवस्थित राहू शकेल का?? महत्वाचे म्हणजे तीचे असणे आपल्याला परवडेल का??? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांच् वादळ डोक्यात उठायचं... (आता इतक्या दिवसांच्या सहवासानंतर जाणवतंय की असं काही नसतं, होते सवय आपल्याला सर्व गोष्टींची आणि आपल्या नकळत ती गरज आणि सवय पण बनून जाते आपल्या आयुष्याची...)
       मग काय अगदी "तुम अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की कोशिश करती है!" वगैरे प्रकार नाही पण एके दिवशी अचानक अशी माझी दोन माणसं मला भेटली, ज्यांनी तीला माझ्या आयुष्यात आणलंच... (त्यापैकी एकाच्या ऋणातुन मुक्त झालोही थोड्या काळात पण दुसऱ्या बद्दल आत्ता इथे थोडक्यात लिहणं म्हणजे सुद्धा माझ्या मनाचा कोतेपणा ठरेल...)
आणि सुरु झाला माझा तीच्या सोबतचा प्रवास...
तसे तर 'उनके बिना हमारी जिन्दगी कोई रुकी नहीं थी, लेकीन उनका साथ मिला और हमने दौड़ना सिख लिया' असं म्हणायला काही हरकत नाही.
म्हणजे असं आहे की तीने दिलेल्या साथीने खरचं माझ्या आयुष्याला एक वेगळीच् गती प्राप्त झाली...
मुद्दा असा आहे की कोणीतरी एक जण असे तुमच्या सोबत असते की जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवते तुम्हाला योग्य दिशा दाखवते आणि त्याच्यामुळे तुमचे जगणे सुकर होते मात्र त्याचे किमान क्रेडिट तरी घेतले जाते. पण इथे वेगळीच् गम्मत आहे; ती मला कधीच गृहीत धरत नाही आणि मी मात्र तीचे मत कधीच विचारत नाही, तिच्या आयुष्यात माझ्याशिवाय मी ठरवले तरंच दूसरे कोणी येते आणि ती मात्र माझ्या आयुष्यात कसलीच ढवळाढवळ करत नाही उलट माझ्या मर्जीने कधी सहा महिन्याच्या मुलाला तिच्या पाठकुळी बसवले आणि त्याच्या पैंजणाने तिच्या पाठीवर ओरखडे उठले तरी रागवता फक्त माझ्या आनंदासाठी गुपचुप सहन करते. कधी ऐंशी वर्षाच्या अनोळखी आजोबा आजींना दवाखान्यात पोहचवते तर कधी एखाद्या सुंदर मुलीला माझ्यासोबत बघुन जळता उलट तिच्या सोबतच्या प्रवासात माझी साथ देवून माझीच शान वाढवते.
बऱ्याचदा असेही घडले की आम्हा दोघांनाही अनोळखी असणाऱ्या कित्येक वाटसरुंना निव्वळ माझ्या हट्टापाई तीने त्यांना मार्गक्रमणात मदत केली. माझं आयुष्य मी कसेही जगेन् तुम्ही माझ्यावर बोजा लादनारे कोण? असा प्रश्न तिने कधीच केला नाही उलटपक्षी मी तीच्या क्षमतांचा बऱ्याचदा कसलाच विचार करता तिच्यावर बोजा लादला आणि तरीही तिने कधीच माझी साथ सोडली नाही. यालाच तर खरं प्रेम म्हणतात का?
माझ्या बरोबर कधी चांगल्या रस्त्याने सुसाट् पळनारी ती कच्या आणि खडकाळ तसेच खड्यांनी भरलेल्या रस्त्यावर सुद्धा तेवढयाच जोमाने मी आहे तू बिनधास्त जग फिर म्हणते...
       
तीच्या सहवासात् असताना तीच्यामुळे मला कधी साधा ओरखड़ा देखील माझ्या शरीरावर मनावर उठु दिला नाही काही घडलेच तर ते माझ्या चुकीमुळे असेल...
मी आजारी पडलो तर ती लगेच मला चांगल्यात चांगल्या डॉक्टर कड़े घेवून जाते तसे तर माझ्या संपूर्ण कुटुंबाबद्दल तीची हीच भावना असते मात्र ती तिची आजारपणं बऱ्याचदा अंगावर काढ़ते मग त्रास जास्तच व्हायला लागला आणि माझ्या कामांचा खोळंबा व्हायची वेळ आली की मग मला जाग येते आणि मी तीला माझ्या सोईने मला वाट्टेल त्या डॉक्टर कड़े तिला घेवून जातो आणि तीचा उपचार करून घेतो. तिथे मात्र ती माझं काहीच ऐकत नाही दवाखान्यातून बाहेर पडायचा अवकाश माझ्या दिमतीला लगेच तयार...
चोवीस तासामध्ये अशी कोणतीच् वेळ नाही ज्यावेळी आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला नाही... कारण मला कधी गरज म्हणून तर कित्येकदा विनाकारण सुद्धा फिरायला आवडंत आणि ती कधीच थकत नाही (तीला फक्त माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पहायंच् असतं. त्यासाठी ती कितीही झिजायला तयार असते सदा. खरंच किती अजब रसायन आहे ती!)
दिनांक ०१ नोव्हेंबर २०१२ रोजी ती माझ्या आयुष्यात आली. आणि ०१ नोव्हेंबर २०१७ ला आमच्या या नात्याला पाच वर्षं पूर्ण झाली.
तब्बल ७५००० किलोमीटरचा अव्याहत प्रवास आतापर्यंत आम्ही दोघांनी एकत्र केलाय!

आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तो प्रवास असाच पुढेही सुरूच राहणार आहे.
यानंतर माझ्या आयुष्यात हिला सरस असं कोणीतरी येईलही कदाचित पण म्हणतात ना कसं ही असो पहिलं प्रेम हे कधीच विसरत नसतं तसं हिचा विसर मला कधीच पडणार नाही...
असो एवढं सगळं ज्या तीच्या बद्दल लिहलंय ती कोण आणि तीचे नाव तर सांगायचेच राहून गेले की...
अहो ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माझी लाड़की दुचाकी MH 13 BG 9672 (HF DELUXE) आहे!
काय म्हणालात तुमचा गैरसमज झाला??? आता घ्या हे बाकि बरयं तुमचं आधी पूर्ण वाचायचं नाही आणि दोष आम्हाला द्यायचा...! 😜
धन्यवाद!
तुमचाच:- ओंकार अर्थात MAD OM!


No comments:

Post a Comment