निव​डक वपुं...

पाहुणचार...


मित्रांकडे, नातेवाईकांकडे आपण जातो....पाहुणचार होतो... चहा किंवा अन्य गोष्टींच्या चवी बद्दल नंतर सवयीने बोलले जाते....पण चव काय पदार्थांची असते...
------------------------------------------------

’जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल?’

"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."
"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"
"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं.
----------------------------------------

त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. इट् इज अ पार्ट ऑफ द् गेम! पुरूष पाहणारच.
स्वाभाविक गोष्टींवर् चिड्ण्यात अर्थच नसतो.
भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, अणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाही.
फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारानी, रसिकांनी कमळाकडे पहावं, भुंग्याकडे पहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं
-------------------------------------------------

’ज्योत’

’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.
सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म.
कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून?
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही,
झंझावातालाही असतं.
-------------------------------------------------

बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल,
पण विचारांनी दूर झाली तर फार वाईट.
पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो,
पन दुसरया बाबतीत निर्माण होणारी भिंतं
त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही.
पुरूषांचं निम्म आधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं.,
आणि बायकांकडून कित्येकदा ,
शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकटं अर्थ घेतला जातो.
स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरूष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे.
त्याला तसचं कारण आहे.
शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरूष फायदा घेतात.
ही किंवा अशा तर्ह्येची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आला आहे
-----------------------------------------

तू भ्रमत आहासी वाया

"सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वार्‍याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश.
वारा म्हणजे जमीन आणि आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसापर्यंत नेणारा दूत.
एका फुलात मला इतकं दिसतं.
------------------------------------------------------------------------------

व.पू. यांची काही निवडक लेखन शैली...

एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण . एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल..
------------------------------------------------------

सत्य काय ?

सर्व भोगातून मुक्त करणारा मृत्यु की जगण्याची उमेद जागवणारे प्रेम ? दोन्हीही परस्पर विरोधी संकल्पना, एका संकल्पनेचे रूप विदारक, भयानक. तर दुसरीचे मनमोहक, चराचर सृष्टीचा अस्तित्व जपणारे / टिकवणारे
------------------------------------------------------------------

असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो.
पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो.
स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.
ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात.
प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर
अर्पण करणारा लंकाधिपती असतो,
तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात
------------------------------------------------------------------

'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’
तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!’
'का?’
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही,
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.
------------------------------------------------------------------

                                   धन्यवाद !